मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने राजीनामा द्यावा

0
36

 – खा संजय राऊत (Sanjay Raut)

(Mumbai)मुंबई : (Chief Minister Eknath Shinde)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत चौकशीमध्ये जे दोषी आढळतील  त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले, मात्र मराठा समाजावर लाठीमार प्रकरणी सरकारच दोषी आहे .राज्य कोणाचे आहे ?गृह खाते कोणाकडे आहे? असा सवाल शिवसेना नेते खा संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

राऊत म्हणाले, विरोधी पक्षांकडे पोलीस खाते आहे का ? विरोधी पक्ष पोलिस खाते चालवत आहे का? आमच्या काळात असे मोर्चे निघाले मात्र असे पोलिसांसारखे लाठीचार्ज हल्ले केले नाही. स्वतः मुख्यमंत्री त्या समितीमध्ये होते .अजित पवार होते त्यांना प्रश्न माहिती आहे .जालना मधील आंदोलन का चिघळले, मराठा समाजावर हल्ले पोलिसांनी का केले यामध्ये एक राजकीय सुसूत्रता आहे. याचवेळी मुंबईमध्ये इंडियाची बैठक सुरू होती. देशातील आणि महाराष्ट्रातील जनता बैठकीकडे लक्ष देऊन होते. नेत्यांची भाषणे सुरू होती .प्रमुख नेते भाषण करत होते आणि ते सर्व माध्यमांमधून दाखवले जात होते. मुळात त्यावरून लक्ष हटवण्यासाठी जालनामध्ये आंदोलनावरती लाठी चार्ज करून गोंधळ निर्माण करण्यात आला.

आतापर्यंत अनेक मोर्चे निघाले .मराठा समाजाचे हे मोर्चे प्रथम निघालेले नाहीत.कधीही कायदा सुव्यवस्था निर्माण झाली नाही. जाणीवपूर्वक लाठी हल्ला करून महाराष्ट्रात तणाव निर्माण केला जात आहे. सरकार वैफल्यग्रस्त झाले आहे त्यातून त्यांची अस्वस्थता बाहेर आली .या मोर्चामध्ये तरुण आबालवृद्ध होते. निवडणुकीआधी  या राज्यात आणि देशात दंगली घडविल्या जातील हे आम्ही देखील सांगत आहोत. हे सरकारचे अपयश आहे. निवडणुकीआधी जात-पात दंगली घडवायच्या आहेत.मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने राजीनामा द्यावा एवढे हे प्रकरण गंभीर आहे. विरोधकांना तुरूंगात टाकायचं, भ्रष्टाचार करायचा, खोटे खटले दाखल करायचे आणि असे हल्ले करायचे कुठे कायदा सुव्यवस्था राहिली आहे असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा