45 लोकसभा तर 200 पेक्षा जास्त जागा विधानसभेत जिंकणार – चंद्रशेखर बावनकुळे

0
34

 

बुलढाणा  BULDHANA  – आगामी निवडणुकांसाठी भाजपने ‘महाविजय २०२४’ Mahavijay 2024′  संकल्पाची घोषणा केली आहे. BJP  भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी रणशिंग फुंकले आहे. लोकसभेसाठी ‘मिशन ४५’, तर विधानसभेसाठी ‘मिशन २००’ Mission 45′, while ‘Mission 200’ for the Legislative Assembly  जाहीर करण्यात आले आहे. या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात विशेष सभा, कार्यकर्ते शिबिरे, मार्गदर्शन सभांचे आयोजन करण्यात आले असून यात बुलढाणा जिल्ह्यातील रजतनगरी खामगावात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीं संपर्क से समर्थन, घर घर चलो अभियानसाठी शहरातून पदयात्रा काढली. यावेळी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ऍड आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात खामगावात मिशन महाविजय 2024 अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी देशांमध्ये समान नागरी कायदा आला तर ते सर्वांचे हिताचेच ठरणार असल्याचे सांगितले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा