मराठवाडा मुक्ती संग्राम सोहळ्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात सक्रियपणे सहभागी व्हा

0
42

 

ना. सुधीर मुनगंटीवार यांचे भाजपा कार्यकर्त्यांना आवाहन Forest and Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar,  

हिंगोली, नांदेड जिल्ह्यात घेतली आढावा बैठक

ठीकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत

 

नांदेड NANDED  :  मराठवाडा मुक्ती संग्राम सोहळ्याच्या  Marathwada Liberation War Ceremony अमृत महोत्सवी वर्षांचा उत्सव साजरा करत असताना या संग्रामाचा जाज्वल्य इतिहास नव्या पिढीसमोर यावा, त्यातून तरुणाईला प्रेरणा मिळावी आणि मराठवाड्यातील विविध विकास कामांचा आराखडा तयार करुन गती मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनाने जिल्हानिहाय कार्यक्रमांची आखणी केली असून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले.

या बैठकांमध्ये नांदेड जिल्हाअध्यक्ष दिलीप कंन्दकुर्ते, हिंगोली जिल्हा अध्यक्ष फुलाजी शिंदे, आमदार तानाजी मुटकुळे, बालाजी कल्याणकर, संजय कोडगे, गजानन घुगे, डॉ. अजित गोपछडे, शरद पाटील, सुधाकर भोयर आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी व चर्चा करण्यासाठी ना. मुनगंटीवार आज हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. औंढा नागनाथ येथे शिवकृपा मंगल कार्यालय येथे भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ना. मुनगंटीवार म्हणाले की, मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित बैठकीत कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष भेटून व चर्चा करुन अतिशय आनंद झाला.
देव, देश आणि धर्मासाठी लढणारी आणि सत्यासाठी संघर्ष करणारी माणसं मराठवाड्याच्या भूमीने जन्माला घातली. आपण भाग्यवान आहात, आपला याच भूमीत जन्म झाला आणि समाज व देशकार्य करण्याची प्रेरणा या भूमीने आपल्याला दिली; त्यांचे पांग फेडण्याची जबाबदारी आपली आहे. निजामाच्या कचाट्यातून, अत्याचारांतून आपली सुटका ज्या हुतात्म्यांनी केली त्यांना अभिवादन करण्यासाठी अमृत महोत्सवी वर्षात मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शासनाच्या स्तरावर आयोजित या कार्यक्रमांत भाजपा कार्यकर्ता मागे राहता कामा नये असे आवाहन ना. मुनगंटीवार यांनी केले.
“राष्ट्र सर्वोपरि” हा विचार मनामनांत रुजविण्याचा आपला संकल्प आहे. स्वातंत्र्यासाठी लढाई सुरू असताना मराठवाडा निजामाच्या कचाट्यातून मुक्त करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात या प्रांतातील प्रत्येक जिल्ह्यात जो संघर्ष उभा झाला आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या निर्णयाला बळ मिळालं हा इतिहास मराठवाड्यासह राज्यातील प्रत्येकालाच ऊर्जा देणारा आहे.

“सौगंध हमें इस मिट्टी की, हम देश नाही झुकने देंगे” अशी प्रतिज्ञा करुन सतत भारतमातेच्या कल्याणाचा ध्यास घेणारे प्रधान सेवक विश्वगौरव पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या संकल्पनांना मूर्त रूप देण्याची जबाबदारी आपली आहे. आपण आपल्याकडे असलेल्या जबाबदारीच्या माध्यमातून राष्ट्र उन्नतीच्या या यज्ञात सेवेची आहुती देण्यास सदैव तत्पर व सज्ज रहा असे आवाहन ना सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
१५, १६ आणि १७ सप्टेंबर रोजी संभाजीनगर सह सर्व जिल्ह्यांत होणारे कार्यक्रम भव्य दिव्य व्हावेत यासाठी सहकार्य करा आणि १६ सप्टेंबर च्या संभाजीनगर येथील कार्यक्रमांत उपस्थित राहण्याचे आवाहन ना मुनगंटीवार यांनी कार्यकर्त्यांना केले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा