
भंडारा ०२ सप्टेंबर : भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातल्या चांदपूर येथे खिशातील मोबाईल जळाल्याने एका बालकाला गंभीर दुखापत झाली आहे. चंदपूर येथे राहणारा 12 वर्षीय प्रीतम किशोर वाघरे हा 7 व्या वर्गात शिकतो. मुलाच्या वडिलांचे देवस्थानच्या आवारात पूजा साहित्य विक्रीचे दुकान आहे.त्यात सकाळी विवो कंपनीचा मोबाईल खिशात टाकून दुकानात जात असताना खिशातून धूर निघू लागला. प्रीतमने फोन काढून फेकून दिला. उपस्थित लोकांनी त्याला मदत करून घरी नेले, त्यात प्रीतम त्याची पॅन्ट जळताना थोडक्यात बचावला, त्यामुळे त्याच्या पायाला दुखापत झाली आणि त्यानंतरच त्याच्यावर उपचार करण्यात आले आहे.