मराठा आंदोलकांनी केला रास्ता रोको

0
40

 

धुळे  DHULE : जालना येथील मराठा आंदोलकांवर  MARATHA ANDOLAN झालेल्या लाठीहल्ल्याचे पडसाद आता धुळ्यात देखील उमटताना बघावयास मिळत आहे, धुळे शहरातील संतोषी माता चौक या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या Maratha Kranti Morcha पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे रास्ता रोको करण्यात आला.
या ठिकाणी मोठ्या संख्येने मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकवटल्याचे बघावयास मिळाले. यावेळी एक मराठा लाख मराठा त्याचबरोबर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांना आदेश देणाऱ्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

महाविकास आघाडीचा रास्ता रोको

बुलढाणा : मराठा समाजाचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आंदोलनाकांवर पोलीसांनी अमानुष लाठीचार्ज केला तर इतकेच नव्हे गोळीबार सुद्धा केला.या लाठीचार्जमध्ये अनेक स्त्री पुरुष जखमी झाले.या घटनेच्या निषेधार्थ आज बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात महाविकास आघाडीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे.बुलढाणा शहरातील त्रिशरण चौकात बुलढाणा-सोलापूर महामार्गावर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन पुकारले. यावेळी मराठा आरक्षण देण्यात यावे ही मागणी करण्यात आली.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा