
-जागतिक लैंगिक आरोग्य दिनानिमित्त आयोजन World Sexual Health Day
नागपूर -जागतिक लैंगिक आरोग्य दिनानिमित्त ज्ञानयोध्दा व्याख्यानमाला अंतर्गत
‘निरामय लैंगिक आरोग्य’

(Sexual Health) या विषयावर शनिवारी सायंकाळी आयोजित कार्यक्रमाला नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या व्याख्यानमालेत
स्त्रियांची लैंगिकता या विषयावर ) डॉ अनघा केकतपुरे ,मानसिक विकृति(आजार)आणि लैंगिकता या विषयी डॉ राजीव पळसोदकर आणि लैंगिक आरोग्य, समज-गैरसमज
या विषयांवर डॉ संजय देशपांडे यांनी उपयुक्त मार्गदर्शन, श्रोत्यांच्या शंकांचे निरसन केले.
शहापूरकर सभागृह’,धरमपेठ कन्या शाळा,धरमपेठ,उत्तर अंबाझरी Dharampeth Girls School, Dharampeth, North Ambazari मार्ग येथे आयोजित व प्रवेश-नि:शुल्क असलेल्या या कार्यक्रमाला सर्व वयोगटातील स्त्री-पुरूषांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. सर्वश्री दिलीप देवधर,रेखा देवधर,प्रविण भागडीकर,जयंत देसाई,जयंत कुळकर्णी,रामनारायण गुप्ता,स्वाती धर्माधिकारी,विनोद हांडे,रत्नाकर केतपूरे,विनोद जोशी,सुनिल गेडाम,स्वाती जोशी,अनघा देवधर,प्रताप काशीकर,विश्राम शास्त्री,मोहन परसोडकर,महेश सावदे,अणि अरूण मोहोळ यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. ज्ञानयोध्दातर्फे यापुढे दर महिन्याच्या एका शनिवारी शहापूरकर सभागृहात दुपारी 4 ते 6.30 या वेळेत आयोजित केला जाईल. उत्सुक श्रोत्यांनी या कार्यक्रमांना हजर राहून बौध्दिक आनंद घेण्याचे आवाहन ज्ञानयोध्दा आयोजन समितीने केले आहे.