
नागपूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी Rahul Gandhi यांनी जवळपास ४ हजार किमी प्रवास करत जात ,धर्मातील दरी मिटवल्या. दुसरीकडे मागच्या सहा महिन्यात राज्यात सात दंगली झाल्या. याला जबाबदार कोण हे कळेलच. काँग्रेसच्या पदयात्रेतून माणसाला जोडू,लोकांच्या वेदना जाणू.
आज सरकारमुळे कोणताच घटक खुश नाही. काँग्रेसला Congress बळकटी या यात्रेने मिळेलच शिवाय माणसाला माणूस म्हणून जोडेल. मी आज चार वाजता जालन्याला निघेल.जालना येथील घटनेची मी तिथे जाऊन माहिती घेईल.हा लाठीचार्ज सरकार पुरस्कृत आणि गृहविभाग पुरस्कृत आहे. मराठा समाजाचा ठिकाठीकाणी उद्रेक दिसतो.केवळ मतासाठी यांची आरक्षणाची बनवाबनवी सुरू होती.ती चूक आता महागात पडेल असे चित्र दिसते. Vijay Vadettiwar