पुणे व चंद्रपूरमध्ये पोटनिवडणूक कधी?

0
105

 

 

पुणे 3 सप्टेंबर : पुणे व चंद्रपूरसह  Pune and Chandrapur देशातील चार लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुका होण्याची शक्यता आता मावळली आहे. राज्यातील या दोन मतदारसंघातील मतदार जवळपास एक वर्ष लोकसभा मतदारसंघ हे खासदाराशिवाय राहणार आहेत.सध्या देशात चार लोकसभा मतदारसंघ रिक्त आहेत. यात उत्तरप्रदेशातील अंबालाचे भाजपचे खासदार रतनलाल कटारिया यांचे २९ मार्च २०२३ रोजी निधन झाले. तेव्हापासून या मतदारसंघात खासदार नाही.

उत्तरप्रदेशातील गाझीपूरचे समाजवादी पक्षाचे खासदार अफजल अंसारी यांना दोन वर्षांपेक्षा अधिक काळासाठी शिक्षा झाल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे.या मतदारसंघातही गेल्या १ मे पासून निवडणूक झालेली नाही. अफजल अंसारी यांनी भाजपचे नेते व सध्या जम्मू व काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांचा पराभव केला होता. १८ मे रोजी पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश बापट  BJP MP Girish Bapat यांचे निधन झाले तर चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे ३० मे रोजी निधन झाले आहे. या दोन्ही मतदारसंघाची पोटनिवडणूक शक्यता वर्तविली जात होती. काही जणांनी तयारीही सुरू केली होती.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा