लाठीमाराचे आदेश देणाऱ्यांना दोष द्या

0
44

 

-राज ठाकरे (Raj Thackeray)

(Jalna)जालना – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जालना (MNS Chief Raj Thackeray) जिल्ह्यातील अंतरवाली सरटी येथे मराठा आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली. यानंतर त्यांनी थेट (Home Minister Devendra Fadnavis)गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लबोल केला. तुम्ही पोलिसांना दोष देऊ नका. पोलिसांना लाठीचार्जचे आदेश ज्यांनी दिले, त्यांना दोष द्या. पोलिस काय करणार? ते तुमच्या आमच्यातलेच आहेत, या शब्दात त्यांनी फडणवीस यांना लक्ष्य केलं.

राज ठाकरे म्हणाले की, मागे जेव्हा मराठा मोर्चे निघाले तेव्हाच म्हणालो होतो, तुम्हाला आरक्षण मिळणार नाही. हे सर्व राजकारणी तुमचा वापर करून घेतील, मत पाडून घेतील. हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाचा आहे. ते सतत तुम्हाला आरक्षणाचे अमिष दाखवून झुलवत ठेवणार आहेत. कधी हे सत्तेत कधी ते विरोधात. सत्तेत आले की, तुमच्यावर गोळ्या झाडतात, अशा शब्दात राज ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला. समुद्रात (Chhatrapati Shivaji Maharaj) छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याच्या नावाखाली तुमच्याकडे मते मागितली होती. हे शक्य नाही, असे मी तेव्हाच सांगितले होते. आपले गडकिल्ले सुधारले पाहिजे, असे ते म्हणाले.

ज्या लोकांनी तुमच्यावर काठ्या आणि गोळ्या चालवल्या, त्यांच्यासाठी मराठवाडा बंद करून टाका, अस आवाहन राज ठाकरे यांनी आंदोलकांना केले. देवेंद्र फडणवीस म्हणतात, याचे राजकारण करू नये, का करू नये, तुम्ही काय केले असते, असा प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केला.

 

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा