
जालना JALNA – जालन्याचे नवे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे Superintendent of Police Shailesh Balakawade अंतरवाली सराटी या उपोषणस्थळी गावात जाणार आहेत. स्वत: पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषद घेवून ही माहिती दिली आहे. बलकवडे यांनी आज जालन्याचे पोलीस अधिक्षक म्हणून चार्ज घेतला. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. सर्वसामान्य माणूस म्हणून मी काम करतो, असे बलकवडे यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर मी अंतरवाली सराटी या गावात जाणार असून आंदोलक मनोज जरांगे यांना भेटणार आहे. आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये झालेले मतभेद दूर करणार आहे, असेही बलकवडे यांनी म्हटले आहे.