मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे – चंद्रशेखर बावनकुळे

0
19

 

नागपूर: इतर कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी करीत  OBC ओबीसीला आरक्षण देणे योग्य नाही. मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे. कायद्यानुसार मराठा समाजाला आरक्षण देण्याचा फडणवीस सरकारने जो निर्णय घेतला होता.
मराठा समाज आर्थिक सामाजिक सर्वेक्षण फडणवीस यांनी केलं होतं.Maratha community should be given reservation – Chandrasekhar Bawankule 

त्या सर्वेक्षणाप्रमाणे पुढे कसे जाता येईल आणि मराठा समाजाच्या मागण्या आहेत त्या पूर्ण कसा करता येईल हा प्रयत्न सरकार करीत असल्याचे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष Chandrasekhar Bawankule  चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. आज बैठकही घेतली आहे. Eknath Shinde and Fadnavis एकनाथ शिंदे आणि फडणवीस मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सुरुवातीपासून सकारात्मक आहेत. ओबीसीतून आरक्षण द्या ही जी वडेट्टीवार  यांची भूमिका आहे ती योग्य नाही ,वडेट्टीवार असे का बोलले मला माहित नाही.राजकारणापोटी इतका खाली स्तर जाणे योग्य नाही. टक्केवारी वाढीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. फडणवीस सरकारच्या काळामध्ये जी टीम होती या सर्वांनी बसून सगळ्यांनी सोशल इकॉनॉमिक्स सर्वे केला होता. सुप्रीम कोर्टात मराठा समाज कसा मागास आहे हे महाविकास आघाडी सरकार आणि विजय वडेट्टीवार मांडण्यात नापास झाले होते. आज आमच्यावर टीका करणाऱ्या शरद पवारांनी हे सगळं कोर्टामध्ये का मांडले नाही. आता आकांडतांडव करत आहे त्याला जबाबदार 40 वर्षापूर्वीचे नेते आहेत. त्यासोबतच उद्धव ठाकरे आणि त्या सरकारमध्ये काम करणारे नेते जबाबदार आहेत असा आरोप बावनकुळे यांनी केला.
सरकारने आपली भूमिका कालच स्पष्ट केलेली आहे..एकनाथ शिंदेंनी पण कालच स्पष्टपणे सांगितले आहे.
पण विरोधी पक्षाच्या हाती कोलीत लागले आहे.मराठा समाज आंदोलन बरोबर आहे.लाठीचार्जची चौकशी केली पाहिजे हे मान्यच आहे . कोणत्या पद्धतीने लाठीचार्ज झाला चौकशी समिती नेमली आहे ते निर्णय देईल.मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी सकारात्मक पाऊल टाकले आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा