तोडगा निघणार?

0
86

 

कुणबी दाखल्यासंदर्भात निर्णयाची शक्यता

(Mumbai)मुंबई– जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठीमाराच्या घटनेनंतर वातावरण तापलेले असताना मराठवाड्यातील मराठा सामाजाला कुणबी दाखला देण्यासंदर्भात निर्णय होऊ शकतो, अशी चर्चा (Maratha Reservation Issue) सुरु आहे. घटनेचा निषेध आणि मागणीसाठी आज महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आला आहे. त्यातच राज्य सरकारसोबत झालेल्या चर्चेत तोडगा निघाला नसल्याने आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे मनोज जरांगे यांनी जाहीर केले असल्याने राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या आज होणाऱ्या बैठकीत दाखल्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. (Chief Minister Eknath Shinde)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक होणार आहे. या बैठकीला (Deputy Chief Minister Devendra Fadnavis)उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि (Deputy Chief Minister Ajit Pawar)उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित राहणार आहे. या बैठकीला मनोज जरांगे यांना देखील निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, त्यांनी ठाम नकार दिला असून आजच निर्णय घेण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या संदर्भात अभ्यास करण्यासाठी महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली अकरा जणांची समिती गठीत करण्यात आली होती. मराठा समाजाच्या महसुली आणि शैक्षणिक नोंदी, निजाम काळात संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, निजाम काळात झालेले करार, राष्ट्रीय दस्तऐवज व इतर कागदपत्रे, मराठा समाजातील लोकांची वंशावळ यावर समितीने अभ्यास केला आहे. ही समिती आजच आपला अहवाल सरकारला सादर करेल आणि त्या आधारे मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत हा महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा