
नागपूर- नागपूर -नार्को टेस्ट Narco test करायचीच असेल तर अनिल देशमुख यांनी नार्को टेस्ट करावी. कारण की अनिल देशमुख यांनी ग्रह मंत्रालयावर खोटे आरोप केले आहेत. ANIL DESHMUKH अनिल देशमुख यांनी महाराष्ट्राची आणि मराठा समाजाची माफी मागावी अशी मागणी माजी आमदार भाजपचे डॉ आशिष देशमुख ASHISH DESHMUKH यांनी केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. पण त्यांना OBC मधून नव्हे तर वेगळे आरक्षण दिले पाहिजे, अशी भूमिका भाजपची आहे.
मराठा समाजाच विषय घेऊन अजित पवार यांना अडचणीत अडकवून पुन्हा आपल्या पक्षात परत आणण्याचा डाव शरद पवार यांचा आहे.ओबीसी समाजाची टक्केवारी कमी झाली नाही पाहिजे. या साठी एकटे वडेट्टीवारच नाही, आम्ही सर्व OBC नेते उभे आहोत. पण मराठा समाजाला पण आरक्षण देण्यात यावे, कारण की त्यांना पण गरज आहे. मराठा समाज फडणवीसांवर विश्वास ठेवतो. करण की जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते, तेव्हाच मराठा समाजाला आरक्षण मिळाले होते आणि महाविकास आघाडीच्या सरकारने ही केस व्यवस्थित हाताळली नाही म्हणून सुप्रीम कोर्टात ते टिकू शकले नाही याकडे लक्ष वेधले.