
नागपूर : उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी आज देवगिरी शासकीय निवासस्थानी जनतेशी संवाद साधला व विविध निवेदने स्वीकारली.
शासन आपल्या दारी कार्यक्रमातील सहभागानंतर फडणवीस यांना भेटण्यासाठी व आपल्या समस्या मांडण्यासाठी नागपुरच्या विविध भागातील नागरिकांनी देवगिरी बंगल्यावर एकच गर्दी केली होती. फडणवीस यांनी येथील सभागृहात नागरिकांची भेट घेतली ,त्यांच्या समस्या जाणून घेतल्या .यात वेगवेगळ्या सामाजिक संस्था, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी आपल्या विविध मागण्या फडणवीस यांच्याकडे मांडल्या. उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्येकाचे निवेदन स्वीकारत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.