तलाठी भरती परीक्षेत हायटेक कॉपीची घटना उघडकीस

0
25

अमरावती AMRAWATI – तलाठी भरती TLATHI BHARTI  परीक्षेच्या तिसऱ्या सत्रामध्ये हायटेक कॉपी करणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून मोबाईल, डिव्हाईस, ईअर फोन जप्त करण्यात आले आहे. उमेदवारांना परीक्षा केंद्रात आत सोडण्याआधी तपासणी केली जाते, त्यावेळी बीड जिल्ह्यातील एका उमेदवाराकडे हायटेक सामुग्री सापडल्याने खळबळ उडाली आहे. अमरावतीच्या ड्रीमलॅन्डमध्ये परीक्षा केंद्रात हा प्रकार घडला असून नांदगाव पेठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती प्रवीण काळे, पोलीस निरीक्षक यांनी दिली.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा