इंडिया आघाडीवरून लक्ष वळवण्याचा हा प्रयोग 

0
17

 

बुलढाणा – देशातील विरोधी पक्षांनी एनडीए सरकारच्या विरोधात स्थापन केलेल्या इंडिया आघाडीवरून लक्ष हटवण्यासाठी जालन्यातील मराठा आंदोलनाकांवर लाठीचार्ज हा प्रयोग असावा असा खळबळजनक संशय मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर Purushottam Khedekar, founder president of Maratha Seva Sangh यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या वक्तव्याने सरकारवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. मराठा आंदोलनास्थळी पोलिसांच्या उपस्थितीची गरज नव्हती, एवढ्या शांततेत आंदोलन सुरू होतं, मनोज जरांगे हे पहिल्यांदाच उपोषणाला बसलेत तशातला भाग नाही, त्यांनी दोन वर्षात आठ ते दहा उपोषण केले केले आहे. शंका प्रामुख्याने येते, जसं दरम्यानच्या काळात राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली होती, त्याच्याकडे जस मीडियाने दुर्लक्ष केलं, त्याप्रमाणे 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर महाराष्ट्रात मुंबईत इंडियाची 31 ऑगस्ट रोजी बैठक होती, 1 सप्टेंबर ला बैठक झाली, हिंदी मीडियात त्याला पाहिजे तेवढा प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर प्रतिसाद दिसत नव्हता. पण, महाराष्ट्रातील सर्वच चॅनेलवर इंडियाच्या बैठकीतील लाईव्ह कव्हरेज दिसत होते. कदाचित महाराष्ट्रातील घरोघरी एनडीए विरोधात इंडिया हा जो काही राजकीय वाद आहे, आणि इंडियाची जी काही सत्य भूमिका आहे, एनडीएच्या विरोधात असलेली त्यांची मत आहे, ती जातील आणि एनडीए धोका होवू शकतो, यामुळे एक षडयंत्र म्हणून का होईना हे घडून आणलं काय, अस म्हणण्याला भरपूर वाव आहे अस संशय मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केला आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा