
नागपूर – नुकतेच म.रा.उ.श्रे. मु.अ.व.सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक महासभेच्या पदाधिकारी यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद नागपूर येथे भेट घेतली. ३०जून रोजी सेवानिवृत्त शिक्षकांच्या न्यायालयीन प्रकरणे व शासकीय आदेश अन्वये १जुलैच्या वेतनवाढीसंबधी आदेश काढून पंचायत समितीला आदेशित करण्यात यावे.तत्पूर्वी दिनांक ०३आगस्ट २०२३ ला व २३ ऑगस्ट २०२३ ला संघटनेतर्फे व वैयक्तिकरित्या निवेदन दिले.मात्र, आजपावेतो आपल्या स्तरावरून तत्संबंधी आदेश काढण्यात आलेले नसल्यामुळे पंचायत समिती सर्व त्यावर कुठलीही कार्यवाही करत नसल्याचे निदर्शनास आणून दिले.आठ आठवड्यात कार्यवाही होणे आवश्यक असून देखील सहा आठवड्याचा कालावधी लोटून गेला आहे….. पण कार्यवाही झालेली नाही याकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले.
शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी संबंधित कर्मचारी घाटोळे यांना बोलवून विचारणा केली त्यावर त्यांनी सीईओकडून कालच मंजूरी आली असून आज वित्त विभागात मंजूरीसाठी पाठवून लवकरच आदेश तयार करण्यात येईल असे सांगितले. मात्र, जवळजवळ आठवडा संपत येऊन सुद्धा आदेश काढून पंचायत समिती (सर्व) यांना पाठविण्यात आले नाही. सेवानिवृत्त संघटनेत मोठा रोष निर्माण झाला असून, पुढील आंदोलनाचे पाऊल उचलण्याच्या पवित्र्यात आहेत
यावेळी विनोद राऊत,जयदेव टाले, सुधाकर भुरके, दीपक तिडके, संजय भेंडे आदी उपस्थित होते.