वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा, सूर्यकुमारला संधी

0
25

नवी दिल्ली- एकदिवसीय विश्चचषकासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी भारतीय कर्णधार रोहित शर्मासह मंगळवारी संघाची घोषणा केली. (Indian Team for World Cup Annouced) भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ४६ दिवसांची ही स्पर्धा होणार असून ५ ऑक्टोबरला स्पर्धेची सुरुवात होणार आहे. त्यासाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली.
पहिला सामना 5 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये मागील विश्वचषकातील विजेता आणि उपविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. 12 नोव्हेंबरपर्यंत ग्रुप स्टेजचे 45 सामने होतील. 15 आणि 16 नोव्हेंबरला दोन सेमीफायनल आणि 19 नोव्हेंबरला फायनल अहमदाबादमध्ये होणार आहे. वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तान सामना १४ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. भारत 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषकात आपल्या मोहिमेला सुरुवात करेल.
या स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेला भारतीय संघ असा-
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा