
नवी दिल्ली-इंडिया हा शब्द गुलामगिरी आणि दास्यत्वाचे प्रतीक असून भारत हा शब्द आपल्या सांस्कृतिक पार्श्वभूमीचे प्रतीक असल्याचे वक्तव्य BJP MP Harnath Singh Yadav भाजपचे खासदार हरनाथ सिंह यादव यांनी केले आहे. सध्याच्या इंडिया विरुद्ध भारत वादावर प्रतिक्रिया व्यक्त करताना यादव यांनी आपली भूमिका मांडली.
खासदार यादव म्हणाले की, संपूर्ण देशाला हे हवे आहे, कानाकोपऱ्यातून मागण्या येत आहेत. संघाच्या सरसंघचालकांनीही भारत या शब्दासाठी आवाहन केले आहे. देशातील जनतेने हा शब्द बोलला पाहिजे. इतर कोणताही शब्द बोलू नये. या देशाचे नाव भारत असून दुसरे नाव नाही. भारत या शब्दात जो आत्मा आहे, तो जिवंत आहे. तो आपल्याला ऊर्जा देतो, श्रद्धेची भावना दाखवतो, तसे इंडियात नाही, असेही ते म्हणाले.
दरम्यान, विरोधी पक्षांनी त्यांच्या आघाडीला इंडिया असे नाव दिल्याने भाजपकडून ही भूमिका घेतली जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
