६ वर्षीय मुलीचे अपहरण

0
89

 शालिमार एक्स्प्रेसमधून घेतले मुलीसह ताब्यात

 

(Buldhana)बुलढाणा – (Mumbai)मुंबई येथून ६ वर्षांच्या मुलीचे अपहरण करण्यात आले. सीसीटीव्हीच्या साहाय्याने पोलिसांनी आरोपीला शेगाव रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वर उभ्या असलेल्या शालिमार एक्स्प्रेसमधून अटक केली. (Rathin Shankar Ghosh) राठीन शंकर घोष वय ३३ असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा (Kolkata West Bengal)कोलकत्ता पश्चिम बंगाल येथील रहिवासी आहे.

(Nagpada Mumbai)नागपाडा मुंबई येथून एका सहा वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून युवक शालिमार एक्सप्रेसने कोलकत्ताकडे निघाला असल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून शेगाव रेल्वे पोलिसांना मिळाल्यानंतर आज बुधवारी सकाळी शेगाव रेल्वे स्थानकावर आरपीएफ, लोहमार्ग पोलीस आणि शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने कारवाई करीत शालिमार एक्सप्रेस शेगाव रेल्वे स्थानकावर अधिक काळ थांबवून गाडीची तपासणी केली. यावेळी नागपाडा येथून अपहृत झालेली चिमुकली आणि अपहरण करणारा आरोपी रेल्वेच्या जनरल कोचमध्ये मिळून आला. शेगाव रेल्वे स्टेशनवर गाडी थांबल्यानंतर आपल्याला पोलिसांनी पाहू नये यासाठी स्टेशन येताच आरोपी शौचालयात जाऊन बसला होता यानंतर (RPF Ranjan Telang)आरपीएफ रंजन तेलंग आणि (Vinod Ingle)विनोद इंगळे यांनी तपासणी केली असता आरोपी सापडला. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपल्या सोबतची चिमुकली जनरल कोचमध्ये वरच्या बाजूला बसवून ठेवल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी सदरच्या चिमुकलीला तेथून रेस्क्यू केले. यानंतर सदरची माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली. आरोपीची कसून चौकशी सुरु असून मुले चोरीच्या रॅकेटची शक्यता (Ranveer Singh Senior Inspector of Police)रणवीर सिंग वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आरपीएफ यांनी व्यक्त केली आहे.

 

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा