
मुंबई MUMBAI -राज्य सरकारच्या वतीने मराठा आंदोलकांना समजवण्याचे सर्व प्रयत्न फेल ठरले आहे. अशातच उपोषणावर असलेले मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे यांची प्रकृती खालावत असल्याने राज्य (Minister Girish Mahajan to Meet Maratha Agitators) सरकारपुढे पेच निर्माण झाला आहे. सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन हे आज पुन्हा जरांगे यांची भेट घेणार असल्याीच माहिती आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे यांची राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने काल भेट घेतली होती. या भेटीत सरकारचे सर्व प्रयत्न असफल ठरले आहेत. मनोज जरांगे हे उपोषणावर ठाम आहेत. त्यामुळे त्यांची प्रकृती देखील खालावली असून राज्य सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन आज पुन्हा मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत. गेल्या नऊ दिवसांपासून मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहेत. त्यांनी उपोषण मागे घेण्याचे राज्य सरकारचे सर्व प्रयत्न वाया गेले आहेत. आज जरांगे यांची तब्येत बिघडली असून डॉक्टरांचे पथक आंदोलनस्थळी दाखल झाले आहे. विशेष म्हणजे गेल्या वेळी मनोज जरांगे यांनी डॉक्टरांकडून उपचार करुन घेण्यास नकार दिला होता. मराठा आरक्षणाचा अध्यादेश राज्य सरकार जोपर्यंत काढत नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याच्या भूमिकेवर ते ठाम आहेत.
