सरकारचे एक पाऊल पुढे

0
27

समितीचा अहवाल ८ दिवसांत येणार

(Mumbai)मुंबई : मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील समितीचा अहवाल आठ दिवसांत सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. अप्पर मुख्य सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली असून आधी या समितीला एक महिन्यांची मुदत देण्यात आली होती. जालना जिल्ह्यात उपोषणावर असलेले कार्यकर्ते (Manoj Jarange) मनोज जरांगे हे उपोषण मागे घेत नसल्यामुळे ही मुदत आठ दिवसांवर आणण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

या वादाला कुणबी विरुद्ध मराठा असे स्वरुप येऊ लागले आहे. मराठवाड्यातील मराठ्यांना विदर्भाच्या धर्तीवर कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी चाचपणी करण्यासाठी सरकारने समिती नेमली आहे. मराठवाड्यातील निजामाच्या काळात मराठा समाजाच्या नोंदी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सगळ्या मराठ्यांना कुणबी असे प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी जरांगे करीत आहेत. यासंदर्भातील काही पुरावे देखील उपलब्ध असल्याचे दावे करण्यात येत आहेत. आता या सगळ्या प्रक्रियेला आणखी वेग देण्यासाठी कुणबी मराठा जातीच्या नोंदी शोधण्यासाठी, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक हैद्राबादला पाठवण्यात आले आहे. मराठवाड्यातील अनेक शेतकरी मराठा कुणबी आहेत. त्याच्या नोंदी तपासून आणि त्यावर अभ्यास करून ही प्रमाणपत्र दिली जातील. त्यातून मराठवाड्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल, असे सांगण्यात येत आहे.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा