
मुंबई- MARATHA ARAKSHN मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे पेच निर्माण झाला असल्याच्या पार्श्वभूमीर राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्यावर विधिमंडळाचे विशेष अधिवेशनही बोलावण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी अध्यादेश काढण्याची मागणी आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून याच मागणीसाठी त्यांचं उपोषण चालू आहे. राज्य सरकारने यासंदर्भात उच्चाधिकार समितीमार्फत अहवाल मागवण्याचा निर्णय घेतल्यानंतरही मनोज जरांगे अध्यादेश निघेपर्यंत उपोषणावर ठाम आहेत. त्यामुळे आता राज्य सराकर काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राज्य सरकार विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून त्यात काही निर्णय घेईल, अशी शक्यताही व्यक्त होत आहे.