स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी रस्त्यावर

0
40

काढला एल्गार मोर्चा

(Amravti)अमरावती-  (Daryapur city)दर्यापूर शहर हे स्पर्धा परीक्षेचं माहेरघर म्हणून ओळखले जाते. अनेक अधिकारी कर्मचारी या शहराने महाराष्ट्र सह संपूर्ण भारताला दिले आहेत. परंतु स्पर्धा परीक्षेत तसेच भरती प्रक्रियेत वारंवार होणाऱ्या गैरप्रकारामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होऊन नैराश्याची भावना निर्माण झाली आहे. भरमसाठ शुल्क शुल्कवाढीमुळे सर्वसामान्य विद्यार्थी त्रस्त झालेला आहे. सोबतच सरळ सेवा भरतीत पेपर फुटी प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई व्हावी, सरळ सेवा भरती करिता एसएससी, एमपीएससीच्या धर्तीवर स्वतंत्र आयोग नेमावा, सरकारी नोकऱ्यांमध्ये खाजगीकरण पूर्ण बंद करावे, उत्तराखंडच्या धर्तीवर पेपर फुटी बाबत कडक कायदा करावा, तसेच सर्व परीक्षांसाठी शंभर रुपये नाममात्र शुल्क आकारण्यात यावा, अशा अनेक मागण्यांसाठी शेकडोंच्या संख्येने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याऱ्या विद्यार्थ्यांनी आज एल्गार मोर्चा काढल्याचे पाहायला मिळाले. यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळाले.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा