भारत-पाकिस्तान सामन्यावर पुन्हा पावसाचे सावट

0
30

(Colombo)कोलंबो : सध्या सुरु असलेल्या आशिया चषक स्पर्धेत पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये लढत होणार आहे. रविवारी 10 सप्टेंबर रोजी कोलंबो येथे होणाऱ्या या लढतीवरही पावसाचे सावट आहे. (IND vs PAK Asia Cup 2023) आशिया चषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या सामन्यातही पावसाने खोडा घातला होता. आता रविवारी होणाऱ्या सामन्यावरही पावसाचे सावट राहण्याची शक्यता हवामान विषयक संकेतस्थळाने व्यक्त केली आहे. रविवारी कोलंबोमध्ये पावसाची शक्यता ७५ टक्के इतकी आहे.

पहिल्या सामन्यात भारताचा डाव झाल्यावर पाऊस आल्याने सामना रद्द झाला व दोन्ही संघांना समान गुण देण्यात आले. मात्र, आता पुन्हा एकदा तीच शक्यता व्यक्त होत आहे. रविवारी दुपारी कोलंबोमध्ये 99 टक्के ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुपारी अडीच वाजता पावसाची शक्यता 77 टक्के असेल तर सायंकाळी पाऊस येण्याची शक्यता 80 टक्के असल्याचे अंदाज आहेत. दिवसभर मुसळधार पाऊस कोसळू शकतो, असेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींची निराश होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा