नेत्याची आत्महत्या

0
47

महिला वकीलावर गुन्हा

(Mumbai)मुंबई-शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुधीर मोरे आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी वकील नीलिमा चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Shiv Sena leader suicide case) चव्हाण यांनी मोरे यांना दिलेल्या मानसिक त्रासामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा तपास करणाऱ्या पोलिसांनी केला आहे. दरम्यान, न्यायालयाने निलीमा चव्हाण यांचा जामीन फेटाळून लावला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, (Advocate Neelima Chavan)वकील नीलिमा चव्हाण यांना मुंबई महापालिकेची निवडणूक लढवायची आहे. त्यासाठी त्यांना (Sudhir More)सुधीर मोरे यांच्याकडून तिकीट हवे होते. त्यातून या दोघांमध्ये वाद होता. त्या मोरेंना ब्लॅकमेल करीत होत्या. आपल्याशी संबंध न ठेवल्यास खोट्या प्रकरणात गुंतवण्याची धमकीही त्यांनी मोरेंना दिली. आत्महत्येपूर्वी नीलिमा चव्हाण यांनी मोरेंना ५६ वेळा फोन केला होता, असेही पोलिसांनी सांगितले.

मुंबईचे माजी नगरसेवक राहिलेले सुधीर मोरे हे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क प्रमुखही होते. ३१ ऑगस्ट रोजी त्यांनी घाटकोपर आणि विद्याविहारदरम्यान रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली होती.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा