टॅक्सीचालकाने आमदाराला धमकावले

0
34

(Mumbai)मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे तुमसरचे आमदार राजू कारेमोरे (Tumsar MLA of NCP Raju Karemore)यांना एका टॅक्सी चालकाने धमकावल्याची घटना घडली असून या प्रकरणी कारेमोरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार कारेमोरे हे सांताक्रुझ येथून कुलाब्यातील आमदार निवासाच्या दिशेने जात असताना हा प्रकार घडला. आमदार कारेमोरे व टॅक्सीचालक यांच्यात टोलचे पैसे देण्यावरून वाद झाला व त्याने आमदार कारेमोरे यांना टॅक्सीतून खाली उतरवत धमकी दिल्याची त्यांची तक्रार होती.

या प्रकरणी आमदार राजू कोरमोरे यांनी वाकोला पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात पोलिस ठाण्यात ५०६ (२), भादवी सह १७८(३) मोवाका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. टॅक्सीचालकाचा शोध लागलेला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा