
(Nagpur)नागपूर : महाराष्ट्र शासन शासकीय सेवा विभाग शासननिर्णयानुसार संपूर्ण नागपूर जिल्ह्यासाठी (Divisional Commissioner Vijayalakshmi Bidari) विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज स्थानिक सुट्या जाहीर केल्या आहेत.
स्थानिक सुट्यांमध्ये शुक्रवार दिनांक १५ सप्टेंबर २०२३ पोळाचा दुसरा दिवस. शुक्रवार दिनांक २२ सप्टेंबर २०२३ महालक्ष्मी पूजन (जेष्ठगौरी पुजन) तसेच सोमवार दिनांक १३ नोव्हेंबर २०२३ लक्ष्मीपुजनाचा दुसरा दिवस या तीन स्थानिक सुट्यांचा समावेश आहे. हा आदेश नागपूर जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालय आणि अधिकोष (बॅक) यांना लागू राहणार नाही.
