रश्मी शुक्लांवरील दोन्ही ‘एफआयआर’ रद्द

0
40

(Mumbai)मुंबई :  (IPS officer Rashmi Shukla)आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध नोंदविण्यात आलेले दोन एफआयआर मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केले आहेत. फोन टॅपिंग प्रकरणात त्यांच्याविरुद्ध हे गुन्हे दाखल होते. यातील पुणे फोन टॅपिंग प्रकरणात फिर्यादीद्वारे क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला होता. तर दुसरीकडे, कुलाबा प्रकरणी शुक्ला यांच्यावर खटला चालवण्यास राज्य सरकारने मंजुरी देण्यास नकार दिला होता. त्यामुळे न्यायालयाने एफआयआर रद्द केले आहेत.

राज्यात महाविकास आघाडी सरकार येण्यापूर्वीच्या कालावधित गुप्तचर विभागाकडून फोन टॅपिंग प्रकरणं घडले होते. रश्मी शुक्ला या त्यावेळी गुप्तचर विभागाच्या आयुक्त होत्या व त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते. एक एफआयआर पुण्यात तर दुसरा मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होता. राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे दोन्ही एफआयआर नोंदविण्यात आले होते. पुण्यात (Congress leader Nana Patole)काँग्रेस नेते नाना पटोले तर मुंबईत (Sanjay Raut)संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे फोन रेकॉर्ड करण्यात आल्याचा आरोप होता.

 

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा