जयस्वालांविरुद्धची याचिका फेटाळली

0
31

जयस्वालांच्या नियुक्तीला आव्हान, याचिका फेटाळली

(Mumbai)मुंबई-: सीबीआयच्या संचालक पदावर सुबोध जयस्वाल यांच्या (Former CBI Director Subodh Jaiswal) यांच्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली.
मुंबई पोलीस दलातील (Retired Assistant Commissioner of Police Rajendra Kumar Trivedi)निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रकुमार त्रिवेदी यांनी जयस्वाल यांच्याविरोधात ही रिट याचिका दाखल केली होती. जयस्वाल यांना भ्रष्टाचारविरोधी प्रकरणाचा तपास करण्याचा कोणताही अनुभव नसून त्यांची विश्वासार्हताच संशयास्पद असल्याचा आरोपही त्रिवेदी यांनी या याचिकेतून केला होता. मात्र, ही याचिका फेटाळण्याची विनंती केंद्र सरकारकडून न्यायालयात करण्यात आली होती.

ही याचिका गुणवत्तेच्या आधारावर ऐकण्यास अयोग्य असल्याचा तसेच जयस्वाल यांचा कार्यकाळ तसाही मे महिन्यात संपुष्टात आला असल्याने याचिकेला तसाही अर्थ उरला नसल्याची भूमिका केंद्र सरकारकडून मांडण्यात आली होती. त्याची दखल घेत ( Devendra Kumar Upadhyay)न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्या. आरीफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने ती फेटाळली. दरम्यान, (Subodh Jaiswal)सुबोध जयस्वाल यांची लवकरच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रमुख पदावर नियुक्ती होण्याची शक्यता असल्याने त्या परिस्थितीत याचिकाकर्त्यांना पुन्हा न्यायालयात येण्याची मुभा देण्यात आली आहे.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा