कुणबी समाज प्रमाणपत्र नकोच !

0
31

मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र नकोच, कुणबी, ओबीसी बैठकीत निर्णय

 संविधान चौकात रविवारपासून आंदोलन -सर्वशाखीय कुणबी समाज,ओबीसी समाज बैठकीत निर्णय

(Nagpur )नागपूर : मराठा समाजाला सरसकट कुणबी समाज म्हणून प्रमाणपत्र देणार असल्यास सहन केले जाणार नाही असा इशारा आज सर्वशाखीय कुणबी समाज, ओबीसी आंदोलन कृती समितीच्या बैठकीतून देण्यात आला. याविरोधात रविचारी सकाळी 11 वाजतापासून संविधान चौकात या धरणे आंदोलनाची सुरुवात होत आहे. या बैठकीला सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. सायंकाळी उशीरापर्यंत ही बैठक सुरू होती याविषयीची माहिती ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

(Former Minister Sunil Kedar)माजी मंत्री सुनील केदार,(Anil Deshmukh)अनिल देशमुख, (Parinay Fuke)परीनय फुके, जिल्हा ग्रामीण भाजपचे अध्यक्ष माजी आमदार अशोक धवड, दीनानाथ पडोळे, सुधाकर कोहळे, (City BJP president Bunty Kukde)शहर भाजप अध्यक्ष बंटी कुकडे, पुरुषोत्तम शहाणे, (Ramesh Chopde)रमेश चोपडे, अवंतिका लेकुरवाळे , शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दूनेश्वर पेठे, राजेंद्र कालमेघ, विजय बाभरे आदी अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित होते. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या विरोध नाही, मात्र आमचा वाटा कुणी घेणार असेल ते कुणबी पर्यायाने ओबीसी शांत बसणार नाही असा इशारा या बैठकीच्या निमित्ताने (National President of OBC Federation Dr. Babanrao Taiwade)ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी दिला.

 

 

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा