मंत्री विखे पाटलांच्या अंगावर उधळला भंडारा

0
27

धनगर आरक्षण

(Solapur)सोलापूर: मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला असताना आता धनगर आरक्षणाचा मुद्दाही पेटण्याच्या मार्गावर आहे. सोलापूरमध्ये धनगर समाज आरक्षण कृती समितीने (Dhangar Reservation Action Committee) महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या यांच्या अंगावर भंडारा उधळल्याचा प्रकार घडला. सोलापूरमधील शासकीय विश्रामगृहात ही घटना घडली. विखे पाटील हे दोन दिवसांच्या दौऱ्यावर तेथे आले आहेत.

विखे पाटील यांच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस असून ते शासकीय विश्रामगृहात थांबले होते. अशातच अनेक लोक त्यांच्या भेटीसाठी तेथे येत होते व आपले प्रश्न मांडत होते. ते लोकांची निवेदने स्विकारत होते. अशातच धनगर आरक्षण कृती समितीच्या काही सदस्यांनी कित्येक वर्ष प्रलंबित असलेल्या धनगर आरक्षणासंदर्भातील निवेदन त्यांना देण्याची विनंती केली. हे निवेदन (Radhakrishna Vikhe Patil)राधाकृष्ण विखे पाटील स्विकारत असताना कार्यकर्त्यांनी अचानक खिशातून भंडारा काढला आणि तो राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर उधळण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सुरक्षारक्षकांनी आणि उपस्थित पोलिसांनी समितीच्या कार्यकर्त्यांना अडवले आणि बाहेर आणले. सध्या पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून सदर बाजार पोलिस ठाण्यात त्यांना नेण्यात आले आहे.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा