राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन

0
18

पितळ उघडे

(Wardha)वर्धा –  (NCP youth leader Sameer Deshmukh)राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते समीर देशमुख यांनी आज वर्धा नगरपालिकेपुढे धरणे आंदोलन करून शहरातील वाढीव घर टॅक्स रद्द करण्याची मागणी रेटून धरली. यानिमित्ताने वाढीव घरटॅक्स रद्द केल्याचे श्रेय घेऊन गाजावाजा करणाऱ्या पक्षाचे पितळ उघडे केले.

वाढीव घर टॅक्स, थकीत घरटॅक्सवर लागणारा वार्षिक 24 टक्के कर, वाढीव पाणीपट्टी कर रद्द करण्यात यावा, घरकुल धारकांचा घर टॅक्स कमी करण्यात यावा, या प्रमुख मागण्यासाठी समीर देशमुख यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसने हे धरणे आंदोलन केले. वाढीव घर टॅक्स झाल्याचे श्रेय लाटून वर्ध्यात राजकारण केले जात आहे. पण प्रत्यक्षात असा कुठलाही जिआर नगरपालिकेला प्राप्त झाला नाही, अशी माहिती मुख्याधिकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मुन्ना झाडे यांना दिल्याचेही समीर देशमुख यांनी स्पष्ट केले.

आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी मोठ्याने घोषणा देत रोष व्यक्त केला.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा