राष्ट्रवादीतील फुटीची लढाई निवडणूक आयोगात सुरु होणार

0
34

(New Delhi)नवी दिल्ली– (NCP)राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीच्या मुद्यावर (Sharad Pawar)शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात उत्तर दाखल करण्यात आले असून (Ajit Pawar)अजित पवार गटाने केलेले सर्व दावे शरद पवार गटाने फेटाळले आहेत. शरद पवार गटाकडून ९ मंत्र्यांसह एकूण ३१ आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आहे. शिवसेनेच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीची लढाई आता निवडणूक आयोगासमोर सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

आतापर्यंत एकूण आमदारांपैकी किती आमदार अजित पवार यांच्याकडे आणि किती शरद पवार यांच्याकडे शिल्लक आहेत, याचा आकडा स्पष्ट झालेला नव्हता. तो आता यानिमित्ताने समोर आला आहे. आतापर्यंत दोन्ही गटाकडून आकडेवारी जाहिर करण्यात आलेली नव्हती. मात्र निवडणूक आयोगासमोर याचिका दाखल करताना शरद पवार गटाने ३१ आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल केल्याची माहिती आहे. यात मंत्र्यांचा समावेश आहे.

 

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा