391 डूक्करांना स्वाईन फ्ल्यूची लागण, शेकडोचा मृत्यू

0
27

(BULDHANA)बुलढाणा – बुलढाणा शहरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात डुक्करे मरण पावत होती. या दरम्यान एका डुक्कराचे शवविच्छेदन करून डुक्करांच्या मृत्यूचे नेमके कारण तपासलं असता या डुक्करांचा मृत्यू स्वाईन फ्लू या आजाराने होत असल्याचे समोर आले आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांवर पशुसंवर्धन विभाग आणि नगरपालिका मिळून बुलढाणा शहरातील बाधित क्षेत्रातील जिवंत डुक्कर यांना नष्ट करत आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार बाधित क्षेत्रातील एक किलोमीटर परिसरातील सर्व डुक्करे शास्त्रशुद्ध पद्धतीने नष्ट केली जात आहेत. यानंतरही दहा किलोमीटर परिसरामधील डुक्करांवर पुढील काही दिवस पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाळत ठेवली जाणार आहे. यामध्ये काही डुक्करांना आजार किंवा लक्षणे आढळल्यास त्या परिसरातील डुक्करे देखील नष्ट केली जाणार आहेत, अशी माहिती राजेंद्र पाटील, जिल्हा पशू संवर्धन उपायुक्त यांनी दिली.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा