
(Mumbai)मुंबई : (Dismissed Congress leader and former minister Rajendrasinh Gudha from Rajasthan)राजस्थानमधील काँग्रेसचे बडतर्फ नेते व माजी मंत्री राजेंद्रसिंह गुढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. शनिवारी शिंदे यांच्या जयपूर दौऱ्यात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. (Rajasthan Chief Minister Ashok Gehlot)राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना मुख्यमंत्री करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. मात्र, अलिकडेच मतभेद वाढलल्याने पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली होती.
राजस्थानच्या विधानसभेत २४ जुलै रोजी लाल डायरी झळकवल्याबद्दल बडतर्फ झालेल्या गुढा यांची विधानसभेतून हकालपट्टी करण्यात आली होती. या डायरीत मुख्यमंत्री गहलोत यांच्या भ्रष्टाचाराची माहिती असल्याचा त्यांचा दावा आहे. राजेंद्रसिंह यांचा मुलगा (Shivam Gudha)शिवम गुढा याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शिंदे त्यांच्या गावी गेले. यावेळी गुढांच्या शिवसेना प्रवेशाचा कार्यक्रम झाला. राजस्थान विधानसभा निवडणुकीत शिवसेना काही जागा लढवू शकते. गुढा आता भाजपसोबत युती असलेल्या शिवसेनेच्या कोट्यातून एका जागेची मागणी करु शकता, असे सांगितले जाते.
