
-सदाभाऊ खोत (Sadabhau Khot)
(Satara)सातारा-मराठा आरक्षणावरुन तणाव वाढत असताना माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत (Former Agriculture Minister Sadabhau Khot on Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर तीव्र टीका केली आहे. (Sharad Pawar)शरद पवार हे लढाऊ नाहीत तर पाठीत खंजीर खुपसणारे सेनापती असून त्यांनीच मराठा समाजाची माती केल्याचा आरोप खोत यांनी केला. पवारांनी आता थांबावे, मराठे त्याची वाट बघत आहेत, असेही ते म्हणाले.
राज्यातील आघाडी सरकारची सत्ता देवेंद्र फडणवीस यांनी उलथवून टाकल्याने शरद पवार आज एका ब्राह्मण नेतृत्वावर मराठा आरक्षणाचे खापर फोडत असल्याची टीका करून खोत म्हणाले की, पवारांनी मराठा समाजाला आरक्षण देता येणार नसल्याचे स्पष्टपणे सांगणारा २००४ मधील बापट आयोग का स्वीकारला? त्यानंतर गायकवाड आयोगाने मराठा समाज मागास असल्याचे पुरावे गोळा केले आणि त्या आधारे मराठा समाजाला आरक्षण मिळाले. पण, राज्यातील आघाडी सरकारच्या काळात शरद पवारांनीच जाणीवपूर्वक मराठा समाजाचे आरक्षण घालवले, असा आरोपही खोत यांनी केला. मराठा समाजाची माती करणाऱ्या पवारांनी हे पाप फेडण्यासाठी आता आझाद मैदानात उपोषण करावे, असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला.
