जनतेच्या भावनांशी खेळतो, त्याला जनता खेळवते

0
25

 – विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar)

(Nagpur)नागपूर – जो जनतेच्या भावनांशी खेळतो, त्याला वेळ आल्यावर जनता खेळवते असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. (Shiv Sena leader Uddhav Thackeray) शिवसेना नेते उध्दव ठाकरे व (Sharad Pawar)शरद पवार यांच्याजवळ चिन्ह नसले तरी जनता पाठीशी असल्याचा दावा केला. वडेट्टीवार आज माध्यमांशी बोलत होते. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या विरोधात संविधान चौक येथे होणाऱ्या उद्याच्या ओबीसी समाज आंदोलनात मी सहभागी होणार आहे.

(BJP)भाजप आणि सत्ताधारी मराठा-ओबीसी यांच्यात वाद लावत आहे. मराठा समाजाला ओबीसी वंशावळ सिद्ध होत असेल तर समस्या नाही. मात्र, त्यापलीकडे झाले तर विरोध कायम राहील. ओबीसीच्या वाट्यातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये. आरक्षणाची मर्यादा 50 टक्के वर करा यावर वडेट्टीवार यांनी भर दिला. G-20 म्हणजे काही खूप मोठी गोष्ट नाही. हुकूमशाही पद्धत असल्याने ते विरोधकांना बोलवत नाही. सरकारला जनतेचे मत पाहिजे पण त्याच्यासाठी काहीच करायचे नाही,का जातीनिहाय जनगणना करत नाही ? निवडणूक आयोगाची कृपा. मोदी यांची कृपा असल्याने आपण कोणताही पक्ष फोडू शकतो, सत्तेच्या जोरावर काहीही करू शकतो, हा त्यांचा समज झालेला आहे असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा