सत्ता येताच ‘फोन टॅपिंग’ ची पुन्हा चौकशी

0
28

-वडेट्टीवार (Vadettivar)

(Mumbai)मुंबई-गुप्तचर विभागाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणात क्लिन चीट मिळून त्यांच्यावरील दोन्ही एफआयआर रद्द झाल्यावर आता काँग्रेसने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आमची सत्ता आली की आम्ही फोन टॅपिंग प्रकरणात पुन्हा चौकशी करणार आहोत. त्यात जे जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करणार आहोत, असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला ( Vijay Wadettiwar in Phone Tapping Case) आहे.

वडेट्टीवार म्हणाले की, सरकार सत्तेच्या भरवशावर खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे केले जाते. सरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला आहे. आमची सत्ता आली कही यात जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई करु आणि सत्य बाहेर आणू, असा इशाराही त्यांनी दिला.

अलिकडेच न्यायालयाने त्यांच्यावरील दोन्ही एफआयआर रद्द केले. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना विरोध पक्ष नेत्यांचे फोन टॅपिंग झाल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. (Rashmi Shukla) रश्मी शुक्ला यांच्यावर बेकायदा फोन टॅपिंग केल्याचा गंभीर आरोप होता. त्यानंतर तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने अहवाल सादर केल्यानंतर शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Congress state president Nana Patole)काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच (NCP leader Eknath Khadse)राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याचा आरोप होता व या दोन प्रकरणात मुंबईतील कुलबा तसेच पुण्याच्या बंडगार्डन पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल होते.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा