Ind vs Pak : टीम इंडियाला मोठा धक्का!

0
27

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप-2023 चा सुपर-4 सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी बोलावले आहे.

टीम इंडियाचा प्लेइंग-11 समोर आला तेव्हा इशान किशन आणि केएल राहुल या दोघांची नावे होती, त्यापैकी एक बाहेर पडणार हे निश्चित मानले जात होते, पण श्रेयस अय्यर बाहेर झाला आहे. तेही शेवटच्या क्षणी. म्हणजे अय्यर खेळणार हे निश्चित होते पण अखेरच्या क्षणी तो संघातून बाहेर पडला.रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्ध श्रेयस अय्यरच्या जागी केएल राहुलचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर या सामन्यात खेळणार नाही. दुखापतीतून सावरल्यानंतर श्रेयस अय्यर नुकताच संघात परतला होता. मात्र तो पुन्हा एकदा जखमी झाला आहे. नाणेफेकच्या वेळेस रोहित शर्माने याचा खुलासा केला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा