आज सायंकाळी सर्वपक्षीय बैठक, तोडगा निघणार?

0
16

मुंबई : मराठा आंदोलकांच्या मागण्यांवर निर्माण झालेला पेच आणि उपायांवर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली असून त्यात उपायांवर चर्चा होणार आहे. सोमवारी सायंकाळी सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक होणार आहे. यात विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

मराठ समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौदावा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मेडिकल उपचारांचा त्याग केला आहे. शिवाय ते कालपासून पाणीदेखील पीत नाहीत. सरकारचा दुसरा जीआरदेखील मनोज जरांगे पाटील यांनी फेटाळून लावला. महाराष्ट्रातील मराठा समाजाला जातप्रमाणपत्र दिल्याशिवाय उपोषण थांबणार नाही, अशी भूमिका असल्याने यावर सर्वपक्षीय नेत्यांसोबत सरकार चर्चा करणार आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात सायंकाळी साडेसात वाजता ही बैठक पार पडणार आहे. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि इतर सर्व सदस्य उपस्थित असतील. या बैठकीसाठी अशोक चव्हाण, काँग्रेस, अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार(काँग्रेस), उदयनराजे भोसले खासदार (भाजप ), नाना पटोले, काँग्रेस, बाळासाहेब थोरात (काँग्रेस ), जयंत पाटील , राष्ट्रवादी, राजेश टोपे, राष्ट्रवादी, चंद्रशेखर बावनकुळे , भाजप, जयंत पाटील , शेकाप, हितेंद्र ठाकूर,बहुजन विकास आघाडी, कपिल पाटील, लोकभारती पक्ष, विनय कोरे, जनसुराज्य पक्ष, महादेव जानकर , राष्ट्रीय समाज पक्ष, बच्चू कडू , प्रहार जनशक्ती पक्ष, राजू पाटील, मनसे, रवी राणा यांच्यासह मुख्य सचिव प्रधान सचिव , विधी व न्याय विभाग यांच्यासह यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान, या बैठकीला आम्ही हजर राहणार असल्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा