
मा केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे शहरातील लीज धारकांना आश्वासन
मा आमदार प्रवीणजी दटके यांच्या मार्गदर्शनाखाली आज नझूल व म न पा भाडेपट्टेधारकांनी मा केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी याची भेट घेतली . गेल्या एक वर्षांपासून या विषयाला घेऊन आमदार प्रवीण दटके शासनाचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न करतात आहे , त्यांनी अधिवेशनात हे मुद्दे उपस्थित करून यावर कायमस्वरूपी धोरण जाहीर करण्याची मागणी सातत्याने केली आहे मात्र त्यावर आजवर संबंधित मंत्र्यांनी कुठलीही भूमिका अजून स्पष्ट केली नाही . साधारण एक लाखाहून अधिक जनता सध्या अस्तित्वात असलेल्या लीज धोरणामुळे अस्वस्थ असून त्यावर लवकरात लवकर सुधारित धोरण आणण्याची मागणी भूखांधारकांच्या वतीने त्यांनी शहराच्या खासदारांना केली . यावर मा केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी मी प्रत्यक्ष मुख्यमंत्री , उप मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांच्याशी बोलून सुधारित धोरण लवकरात लवकर जाहीर करण्यास सांगतो असे आश्वासन दिले . यावेळेस सर्व मौज्याचे प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येत भूखंडधारक उपस्थित होते
