आरक्षणाच्या मुद्यावर राजकारण नको-फडणवीस

0
20

नागपूर- आरक्षणाच्या मुद्यावर राजकारण न होता सर्वंकष असा निर्णय व्हायला हवा, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. या मुद्यावर आज सरकारच्या वतीने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन सायंकाळी करण्यात आले आहे. त्यावर भाष्य करताना फडणवीस यांनी सांगितले की, सर्वांनी मिळून एकमताने या प्रश्नावर विचार करण्यासाठी व त्यातून तोडगा काढण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

फडणवीस म्हणाले की, जालना येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर समाजातील अनेक प्रश्न पुढे आले आहेत. त्यांचाही विचार या निमित्ताने बैठकीत होणार आहे. आरक्षणावर राजकारण न होता समाजाच्या हिताचा निर्णय कसा होईल, याचे प्रयत्न होणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांना आवाहन केले आहे. लोकशाहीत आंदोलनाला मान्यता आहे आणि पद्धत देखील आहे. सर्वांना मिळून या प्रश्नावर मार्ग काढावा लागेल. सरकारला सर्वोच्च न्यायालय, कायदाचा विचार करावा लागतो. प्रश्न सोडविण्यासाठी ते कायद्याच्या चौकटीत टिकले पाहिजे, याचाही विचार सरकारला करावा लागतो. अन्यथा आमची फसवणूक झाली, असे समाज म्हणेल, याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा