आरक्षण न्यायालयात टिकणारेच असावे-मुख्यमंत्री

0
26

मुंबई MUMBAI – मराठा आरक्षणाच्या  MARATHA ARKSHN मुद्यावर राज्य सरकारने सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजाला देण्यात येणारे आरक्षण हे न्यायालयात टिकणारे असावे, अशीच राज्य सरकारची भूमिका असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. maratha reservation 

मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य न झाल्याने त्यांचे उपोषण आंदोलन अजूनही सुरूच आहे. या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षिय नेत्यांची बैठक बोलवली आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे होत असलेल्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यादरमयान न्यायालयात टिकेल असे आरक्षण देण्याची राज्य सरकारची भूमिका असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली त्यावेळी उमेदवारांची निवड झाली होती, पण त्यांना नेमणूक मिळाली नव्हती. अशा 3700 तरुणांना नोकऱ्या दिल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहे. सगळ्या योजना, ओबीसींना मिळणारे सर्व लाभ आपण मराठा समाजाला देत असल्याची माहिती देखील शिंदे यांनी दिली.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा