ठाकरे गटाचे नेते बबनराव घोलपांचा राजीनामा

0
19

शिर्डी SHIRDI  : शिवसेनेच्या ठाकरे गटात पुन्हा धुसफूस सुरु झाली आहे. ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप Babanrao Gholpa  यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अंतर्गत गटबाजी या राजीनाम्यास कारणीत असल्याचे दिसून आले. दरम्यान, घोलप यांची समजूत घालण्याचे प्रयत्न सुरु असून त्यासाठी त्यांना धीर धरण्यास सांगण्यात आले आहे.

अलिकडेच ठाकरे गटात भाऊसाहेब वाकचौरे यांना प्रवेश देण्यात आला. त्यामुळे घोलप नाराज झाले आहेत. २०१४ ला वाकचौरे यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेशी गद्दारी केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला असून पुन्हा वाकचौरेंना लोकसभेसाठी तिकीट मिळणार असल्याची चर्चा असल्याने घोलप समर्थक नाराज आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील शिवसेनेचे माजी शहरप्रमुख भरत मोरे यांनी थेट Shiv Sena Chief Late. Balasaheb Thackeray शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या नावे लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

दरम्यान, घोलप म्हणाले, आम्ही 55 वर्ष शिवसेनेत काम करतोय.मला दुसऱ्या पक्षात जायची गरज नाही. मी 55 वर्षे शिवसेनेत आहे. मला जे काय हवं आहे ते मी माझ्या पक्षात भांडून घेणार आहे. मला इकडे तिकडे जायची गरज नाही, असेही ते म्हणाले.
भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी द्यायची होती तर त्यांना ती आधीच द्यायला हवी होती. मला का आश्वासन दिलं?, असा सवालही घोलप यांनी उपस्थित केला. भाऊसाहेब वाकचौरे यांना मीच शिवसेनेत आणल होतं. त्यांना मीच उमेदवारी दिली होती. पण ते गद्दार निघाले, त्यांनी पक्ष सोडला, काँग्रेसमध्ये गेले, त्यानंतर भाजपमध्ये गेले, असे सांगत तुम्हाला शिवसेनेत माणसे ठेवायची आहेत का? असा सवाल देखील घोलप यांनी विचारला आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा