लालू प्रसादांच्या विरुद्ध खटला चालवण्यास परवानगी

0
16

गृहमंत्रालयाकडून सीबीआयला मिळाला हिरवा कंदिल

नवी दिल्ली, : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात खटला चालवण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाने सीबीआयला परवानगी दिली आहे.

या परवानगीनंतर सीबीआयने दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाला सांगितले की, माजी केंद्रीय रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांच्याविरुद्ध नोकरी घोटाळ्यात नव्या आरोपपत्राला गृह मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे. यापूर्वी 1 ऑगस्ट रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जमिनीच्या बदल्यात नोकरीच्या प्रकरणात लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाची मालमत्ता जप्त केलेली आहे. ही मालमत्ता लालूंची पत्नी राबडी देवी, मुलगी मिसा भारती, मुलगी हेमा यादव यांचे पती विनित यादव, हेमा यादव यांचे सासरे शिवकुमार यादव यांची आहे. लालू यादव 2004 ते 2009 या काळात रेल्वेमंत्री असताना त्या काळात जमिनीच्या बदल्यात रेल्वेत नोकऱ्या दिल्याचा आरोप करण्यात आला होता. ही नोकरी गट ड मध्ये देण्यात आली होती.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा