अमरावतीच्या पोलीस कॉन्स्टेब्लची एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये 

0
20

 

अमरावती AMRAWATI  -पोलीस आयुक्तालयातील  Police Constable Praveen Akhre पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण आखरे यांनी शरीराच्या कुठल्याही अवयवाची हालचाल न करता तब्बल एक तास दोन मिनिटे पाण्यात राहून एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद केली आहे.

अमरावती आयुक्तालय परिसरात असलेल्या जलतरण तलावाचे व्यवस्थापक असलेले प्रवीण आखरे यांनी यापूर्वी इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये India Book of World Records स्विमिंग करत नोंद केली होती. त्यानंतर त्यांनी आज तब्बल एक तास दोन मिनिट कुठलीही हालचाल न करता पाण्यात राहण्याचा विक्रम केला. नाकातोंडापर्यंत पाणी जाईपर्यंत ते स्विमिंग पूल मध्ये होते. मात्र, त्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा व आपली जिद्द पूर्ण करत इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केल्यानंतर प्रवीण आखरे यांनी हातात तिरंगा घेतला. पोलीस आयुक्त यांनी प्रवीण आखरे यांनी एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केल्याबदल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा