मुख्यमंत्री शिंदे यांचे ठाकरेंच्या संपत्तीवरून गंभीर आरोप!

0
28

मुंबई MUMBAI -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी झालेल्या चर्चेचा संदर्भ देत शिंदे यांनी ठाकरे यांच्या लंडनमधील कथित संपत्तीबाबत भाष्य केल्याने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. (CM Eknath Shinde on Uddhav Thackeray) “पंतप्रधान ऋषी सूनक यांनी आपल्याशी चर्चा करताना ‘युटी’ कसे आहेत, असं विचारल? ते दरवर्षी लंडनला येतात, थंडगार हवा खातात, मोठमोठी संपत्ती विकत घेतात..असंही सूनक यांनी आपल्याला सांगितले ”, असे शिंदे म्हणाले.uddhav thackeray eknath shinde 
शासन आपल्या दारी कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी हा दावा केला तसेच युटी म्हणजे काय, यावर स्पष्टीकरणही दिले. शिंदे म्हणाले, “मी एवढंच सांगतो की, आम्हाला सगळे माहिती आहे. आमच्यावर बोलण्याची वेळ येऊ देऊ नका. अन्यथा पाटणकर काढा घेण्याची वेळ येईल,” असा इशाराही शिंदेंनी यावेळी दिला. पंतप्रधान सूनक यांनी ठाकरे यांच्या संपत्तीबद्दल सविस्तर माहिती देण्याचे आश्वासन दिले असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. ठाकरे यांच्या मनावरचा ताबा गेलाय. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणून ते काहीही बोलू लागले आहेत, अशी टीकाही शिंदेंनी केली.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा