काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेचा समारोप

0
15

 

अमरावती : राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ काँग्रेसच्या वतीने अमरावती जिल्ह्यात जनसंवाद यात्रा काढण्यात आली. तिवसा विधानसभा मतदार संघातील कर्मयोगी संत गाडगे महाराज यांची निर्वाणभूमी असलेल्या वलगांव येथुन या जनसंवाद यात्रेला सुरुवात करण्यात आली. ही यात्रा वलगांव येथून नया अकोला येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले. यानंतर जनसंवाद यात्रा पुढे पुसदा, डवरगांव, शिराळा, नांदुरा, यावली शहिद, तिवसा, मोझरी गुरुकुंज, वाठोडा, शेंदुरजना बाजार, शेंदुरजना माहोरा मार्गे कुऱ्हा येथे पोहचल्यानंतर या जनसंवाद यात्रेचे तिवसा तालुक्यातील कुऱ्हा येथे जोरदार स्वागत करण्यात आले. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील कलावती बांदुरकर यांनी केंद्र व राज्य शासनाची पोलखोल करीत दहीहंडी फोडून यात्रेचा समारोप केला. या जनसंवाद यात्रेमध्ये आमदार ॲड. यशोमती ठाकूर, आमदार बळवंत वानखडे,जेष्ठ पत्रकार निरंजन टकले, कलावती बांदुरकर, नितेश कराळे गुरुजी, आदी मान्यवर उपस्थित होते.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा