
नागपूर NAGPUR -सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पडलेल्या पावसाने जवळपास राज्यभरात शेतकऱ्यांना दिलासा दिला. मात्र, मागील आठवडाभरात पावसाला खंड पडल्यावर आता पुन्हा राज्यात पावसाचे दमदार आगमन होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.विशेषतः पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित विदर्बात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.rain update
मागील काही दिवसात राज्याच्या बहुतांश भागात पावसाने दडी मारली आहे. काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत असला तरी सर्वच शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. तर मुंबईसह संपूर्ण कोकणातही जोरदार पावसाची शक्यता आहे.

ऑगस्ट महिन्यात अजिबात पाऊस न झाल्याने पावसाची मोठी तूट आताही कायम आहे. विदर्भातही ही तूट कायम असून अमरावती विभागात तुलनेने कमी पाऊस झाला आहे.